भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते गिरीश बापट यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले असून बुधवारी त्यांची प्रकृती खालावली, त्यानंतर त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. गिरीश बापट यांच्या निधनाची माहिती पुणे भाजप अध्यक्ष जगदीश मल्लिक यांनी दिली आहे. केवळ पुणे शहर व जिल्ह्यातच नव्हे तर देशभरात त्यांच्या कार्याचा गौरव झाला आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक मान्यवर राजकीय नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. हेही वाचा Girish Bapat Dies: पुण्याचे भाजपा खासदार गिरीश बापट यांचे निधन
देवेंद्र फडणवीसांचे ट्विट
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आणि धक्कादायक आहे.
पक्षनिष्ठ, पण पक्षापलिकडे जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे, सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे, राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे.… pic.twitter.com/twzkH4BVNK
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 29, 2023
राज ठाकरेंचे ट्विट
पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार, माजी मंत्री, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माझे मित्र श्री. गिरीश बापट ह्यांचं निधन झालं. राजकीय मतभेद हे व्यक्तिगत मैत्रीच्या आड येऊ द्यायचे नसतात, ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती गिरीश बापटांनी कसोशीने पाळली. त्यांच्या निधनाची बातमी अतिशय… pic.twitter.com/LOBa3ZqRg7
— Raj Thackeray (@RajThackeray) March 29, 2023
अजित पवारांचे ट्विट
राज्याचे माजी मंत्री, विद्यमान खासदार सन्माननीय गिरीश बापट यांचं निधन हे पुणे जिल्ह्यातल्या आम्हा सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. महाराष्ट्राचं सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून गिरीशभाऊंकडे पाहिलं जायचं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/gyrwqDqi4n
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 29, 2023
शरद पवारांची प्रतिक्रिया
पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत गिरीश बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला. #GirishBapat pic.twitter.com/qkATwWyx46
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 29, 2023
अमित शाहांचे ट्विट
पुणे के सांसद और भाजपा के वरिष्ठ नेता गिरीश बापट जी का निधन भाजपा के लिए एक अपूरणीय क्षति है। बापट जी अपनी अंतिम साँस तक देश और संगठन के हित के प्रति समर्पित रहे। दुःख की इस घड़ी में पूरा संगठन उनके परिवार के साथ खड़ा है। ईश्वर दिवंगत आत्मा को अपने श्रीचरणों में स्थान दें।ॐ शांति
— Amit Shah (@AmitShah) March 29, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)