वीज सवलतीसाठी वस्त्रोद्योग विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी न केलेल्या यंत्रमागधारकांची वीजसवलत बंद करण्याच्या निर्णयास तूर्त स्थगिती देण्यात आली आहे. यंत्रमागधारकांची थांबविण्यात आलेली वीजसवलत पूर्ववत करण्याचे निर्देश वस्त्रोद्योग आयुक्तांना देण्यात आले आहेत, अशी माहिती वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी दिली.
वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी रविवारी, इचलकरंजी येथील संवाद सभेत यंत्रमागधारकांची वीजबिल सवलत पूर्ववत ठेवण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करत आज वस्त्रोद्योग आयुक्तांना वीज बिल सवलत पूर्ववत सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. ऑनलाईन अर्ज प्रणाली सुलभ करण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित करण्याबरोबरच यंत्रमागधारकांकडून सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.
वीज सवलतीसाठी २७ अश्वशक्तीपेक्षा जास्त जोडभार असणाऱ्या यंत्रमागधारकांना ऑनलाईन नोंदणी बंधनकारक होती. या निर्णयास तूर्त स्थगिती देण्यात आली असून त्यांची वीजसवलत पूर्ववत करण्याचे निर्देशही आयुक्तांना दिले आहेत, अशी माहिती वस्त्रोद्योग मंत्री @AslamShaikh_MLA यांनी दिली. pic.twitter.com/myO8VUAtRq
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)