साधारण 56 वर्षांपूर्वी शिवसेनेचा जन्म झाला तेव्हापासून बाळासाहेब ठाकरे दरवर्षी दसऱ्याला मुंबईतील शिवाजी पार्कवर मेळावा घेत असत. दसरा मेळाव्यात त्यांचे भाषण ऐकण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक शिवाजी पार्कवर जमायचे. हा मेळावा शिवसेनेसाठी प्रतीक बनला होता. यंदा पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होत आहेत. वांद्र्याच्या बीकेसी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पार पडत आहे. या मेळाव्याला उद्धव ठाकरे यांचे बंधू जयदेव शिंदे यांनी हजेरी लावली. मी एकनाथरावांच्या प्रेमासाठी मेळाव्यात आलोय असे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना जयदेव ठाकरे यांनी शिंदे यांच्या कामाचे कौतुक केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)