मध्यरात्री डहाणू आणि वनगाव रेल्वे स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची चर्चगेटच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक पूर्ण विस्कळित झाली आहे. पश्चिम रेल्वेने युद्धपातळीवर सकाळपर्यंत काम पूर्ण केले. असं असलं तरी डहाणू मार्गावरून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या सर्व लोकल सेवा आणि लांब पल्ल्याच्या गाड्या या उशिराने धावत आहेत. दरम्यान, पश्चिम रेल्वेवर खार-गोरेगाव स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. त्यासाठी 27 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबरपर्यंत या 11 दिवसांत 2,525 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. (हेही वाचा - Mumbai Local Update: पश्चिम रेल्वे मार्गावर सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी आज लोकल सेवा विस्कळीत; पहा रद्द झालेल्या लोकल ट्रेन्स कोणत्या?)
पाहा पोस्ट -
Due to the OHE breakdown between Dahanu Road & Vangaon Stations, various Down-direction trains have been delayed. Help Desks have been placed at various stations to assist passengers. pic.twitter.com/IiXPno8QvY
— DRM - Mumbai Central, WR (@drmbct) November 1, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)