अनुभवी साथीरोग तज्ञ, कोविड योद्धे डॉ. ओम श्रीवास्तव यांची मंगळवार (27 सप्टेंबर) दिवशी प्राणज्योत मालवली आहे. एप्रिल 2022 मध्ये त्यांना कार्डिएक अरेस्टचा झटका आल्यानंतर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील 4 महिन्यांपासून ते व्हेंटिलेटर वर होते. अखेर काल त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अयशस्वी ठरली आहे. मुंबईत अनेक साथींच्या आजारांदरम्यान त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. कोविड संकटाच्या वेळेसही ते टास्क फोर्सचा एक भाग होते. वयाच्या 55 व्या वर्षी त्यांनी ब्रीज कॅन्डी हॉस्पिटल मध्ये शेवटचा श्वास घेतला आहे. त्यांच्या अकाली एक्झिटवर आदित्य ठाकरेंनी शोक व्यक्त करत आपली आदरांजली अर्पण केली आहे. नक्की वाचा:  डॉ. संजय ओक ते मुफ्फज़ल लकड़ावाला महाराष्ट्राच्या कोविड19 विरूद्ध लढ्यात हे डॉक्टर बजावत आहेत महत्त्वाची भूमिका!

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)