Ganesh Chaturthi 2023: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह आज गणेश चतुर्थीनिमित्त पूजा केली. फडणवीस पत्नी, मुलगी आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह गणेशाची पूजा करताना दिसले. महाराष्ट्राची समृद्ध परंपरा असलेला गणेशोत्सव आता केवळ राज्यातच नव्हे तर देश-विदेशातही मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज सकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी श्रीगणेशाची पूजा केली. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री शिंदे यांनी बाप्पाचे मुंबईतील निवासस्थानी स्वागत केले. इंटरनेटवर समोर आलेल्या व्हिज्युअलमध्ये मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या पत्नीसह गणेश आरती करताना दिसतात.
#WATCH | Mumbai: Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis along with his family offers prayers on the occasion of #GaneshChaturthi pic.twitter.com/dgN2b1EUDr
— ANI (@ANI) September 19, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)