चिपळूणसह कोकणातील अन्य भागात पाऊस-पुराच्या स्थितीबद्दल देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांना पिण्याचे पाणी आणि अन्नाची पाकिटे देण्याची विनंती फडवणीस यांनी केली आहे.
Tweet:
चिपळूणसह कोकणातील अनेक भागात पाऊस-पुराच्या स्थितीमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन आणि इतरही माझे सहकारी या भागात दौरे करीत आहेत. पिण्याचे पाणी आणि तयार अन्नाची पाकिटे ही आताच्या घडीला तातडीची गरज आहे. (1/3)
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 23, 2021
या स्थितीबाबत मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे @OfficeofUT जी यांच्याशी मी चर्चा करून पिण्याचे पाणी आणि अन्न पाकिटे याबाबत तातडीने लक्ष देण्याची विनंती केली. त्यांनी सरकार ते तत्काळ उपलब्ध करून देईल, असे सांगितले आहे. यात सरकारला आमचे संपूर्ण सहकार्य असेल, असेही त्यांना सांगितले (2/3)
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 23, 2021
काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यात ज्यांचे प्राण गेले त्यांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही सारे या कुटुंबीयांसोबत आहोत.
जखमींना लवकर बरे वाटावे, यासाठी प्रार्थना करतो. (3/3) #MaharashtraRains #flood #HeavyRains
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 23, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)