एकनाथ शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळ यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना समन्स बजावले आहे. न्यायालयाने सर्वांना 17 एप्रिल रोजी सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या याचिकेत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदार-खासदारांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला होता. न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, आता तिघांनाही प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. हेही वाचा Sanjay Raut On BJP & Eknath Shinde: 'अदानी बचाव यात्रा' म्हणत संजय राऊत यांचा भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)