Dahi Handi 2022 उत्सवात विलेपार्ले मध्ये मृत्यूमुखी पडलेला गोविंदा संदेश दळवी यांच्या कुटुंबियांना तातडीने 10 लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधिमंडळामध्ये दिली आहे. दरम्यान मागील 2 दिवस त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते पण प्रयत्नांची पराकाष्टा करूनही त्याला वाचवणं शक्य झाले नाही.
पहा ट्वीट
दहीहंडी उत्सवादरम्यान जखमी झालेल्या गोविंदांना उपचाराच्या योग्य सुविधा पुरविण्याचे निर्देश. विलेपार्ले येथील मृत्युमुखी पडलेल्या संदेश दळवी यांच्या कुटुंबियांना तातडीने दहा लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 23, 2022
#दहीहंडी दरम्यान जे गोविंदा जखमी झाले, त्यांना योग्य उपचार मिळावेत, कुणाचा मृत्यू होऊ नये यासाठी नियंत्रण पथकास निर्देश दिले होते. दुर्दैवाने संदेश दळवी यांचा मृत्यू झाला असून तातडीने त्यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांचे सहाय्य दिले जाईल-मुख्यमंत्री @mieknathshinde यांची माहिती pic.twitter.com/leP4sM47Ny
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)