महाराष्ट्रातील एका न्यायालयाने रोड रेज प्रकरणातील दोषीला झाडे लावणे आणि दिवसातून पाच वेळा नमाज अदा करण्याची शिक्षा सुनावली आहे. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील एका मुस्लीम व्यक्तीला रस्ता अपघातात झालेल्या भांडणप्रकरणी मालेगावच्या दंडाधिकार्‍यांनी दोषी ठरवले आहे. प्रकरणामध्ये या व्यक्तीचे वर्तन फार हिंसक नसल्याने, त्याने सुनावणीदरम्यान आपल्याला तुरुंगात न पाठवण्याची विनंती केली होती. न्यायालयाने त्याचे अपील मान्य केले आणि त्याला स्थानिक मशिदीत दोन झाडे लावावीत व 21 दिवस दिवसातून पाच वेळा नमाज अदा करावी अशी शिक्षा सुनावली. रौफ खान (30) याच्यावर 2010 मध्ये एका व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी आणि रस्ता अपघाताच्या वादातून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)