शरद पवारांनी अदानी प्रकरणात JPC ला विरोध केल्यानंतर आता राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा चर्चा रंगायला लागल्या आहेत. राहुल गांधी यांनी ट्वीट करत पुन्हा 'अदानींच्या शेल कंपनीं'मध्ये नेमके कुणाचे पैसे आहेत? हाच प्रश्न पुन्हा विचारला आहे. तर एनसीपी चे अध्यक्ष आणि यूपीए मधील ज्येष्ठ नेते शरद पवारांनी आपली वेगळी भूमिका मांडल्यानंतर महाराष्ट्र कॉंग्रेसच्या नेत्यांनीही सावध भूमिका मांडली आहे. दरम्यान शरद पवारांची वेगळी भूमिका ही त्यांची वैयक्तिक भूमिका असू शकते असं म्हणत याचा परिणाम 2024 च्या लोकसभा निवडणूकीत एकजुटीवर होणार नसल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
अशोक चव्हाण
#WATCH | Mumbai | I think this is his (Sharad Pawar) personal opinion. I do not think that this statement of his will make any difference to the unity of the opposition in the 2024 elections. But I would only say that if opposition takes a decision on any issue unitedly, then all… pic.twitter.com/Tfcsgc326t
— ANI (@ANI) April 8, 2023
नाना पटोले
#WATCH | Nagpur: That is his (Sharad Pawar) personal opinion. But now the public is asking why the PM is afraid of the Adani issue. If PM says nothing is being hidden then why they (BJP) are afraid of it: Nana Patole, Maharashtra Congress President on NCP chief Sharad Pawar's… pic.twitter.com/GpTubXufEq
— ANI (@ANI) April 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)