संजय राऊत यांना मिळालेल्या कथीत धमकीची आम्ही चौकशी करु. त्यांनी दिलेल्या पत्राची पोलीस चौकशी करतील. त्यात तथ्य आहे की स्टंट याचीही चौकशी केली जाईल. राज्याचे पोलीस त्यांची काळजी घेतील, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचा दावा केला होता. आपल्या आरोपात राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा उल्लेख केल्याने प्रकरणातील गांभीर्य वाढले आहे.
ट्विट
"We will investigate the threat call to Sanjay Raut. We will also investigate if this is a stunt, the state police will take care of security," says Maharashtra CM Eknath Shinde https://t.co/hDWLiDNHvX pic.twitter.com/grE5DBJYYs
— ANI (@ANI) February 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)