उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना विकासकामे करुन प्रत्युत्तर देऊ, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यावरील टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. या वेळी त्यांनी म्हटले की, त्यांनी आत्मपरीक्षण पाहिजे. आज फक्त जागा वेगळी होती, नाहीतर त्याचे शब्द आणि आरोप तेच होते. उद्या ते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणू शकतात. त्यांच्या आरोपांना आम्ही विकासकामे करून उत्तर देऊ, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

दरम्यान, खेड येथील सभेतून बोलताना उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्ला चढवला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील बंडखोर आमदारंना उद्देशून टीक करताना ठाकरे म्हणाले, आपण ठरवायचे आहे की ज्यांचा स्वातंत्र्यलढ्याशी काही संबंध नाही आणि ज्यांची पशुप्रवृत्ती आहे त्यांना 2024 मध्ये गाढून टाकले पाहिजे. आपण शपथ घेतली पाहिजे की आम्ही भारत मातेला गुलामगिरीच्या तावडीत जाऊ देणार नाही. आम्ही तसे केले नाही तर 2024 च्या निवडणुका शेवटच्या असतील, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)