सगळे काही 'असुर' आणि 'बेसूर' नसतात तर काही त्यांच्यासारखे 'सुरेल'ही असतात असे उद्गार काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाजाचे कौतुक केले आहे. याबाबत त्यांनी एक एक्स पोस्टही लिहीली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ''नितीनजींचे 'तुझसे नाराज नही जिंदगी हैरान हू मै..' हे आवडतं गाणं ते आवर्जून गातात तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गायलेलं 'श्रीवल्ली' देखील चांगलंच व्हायरल झालं आहे. त्यामुळे राजकारणात सगळे काही 'असुर' आणि 'बेसूर' नसतात तर काही त्यांच्यासारखे 'सुरेल' असतात, हेदेखील यानिमित्ताने पहायला मिळाले असल्याचे सांगितले. नितीन गडकरी साहेबांनी हाताळलेले एमएसआरडीसी खाते जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा ते कर्जाच्या बोज्याखाली होते. मात्र देवेंद्रजी मला म्हणाले की हे खाते आपण मिळुन एवढं मोठं करू की तुम्ही ते कधीच सोडणार नाही, आणि प्रत्यक्षात तसच घडलं. याच खात्यामुळे समृद्धी महामार्ग आणि अनेक प्रकल्प उभे राहिले आहेत याचा सार्थ अभिमान वाटत आहे''.
एक्स पोस्ट
नितीनजींचे 'तुझसे नाराज नही जिंदगी हैरान हू मै..' हे आवडतं गाणं ते आवर्जून गातात तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गायलेलं 'श्रीवल्ली' देखील चांगलंच व्हायरल झालं आहे. त्यामुळे राजकारणात सगळे काही 'असुर' आणि 'बेसूर' नसतात तर काही त्यांच्यासारखे 'सुरेल' असतात, हेदेखील… https://t.co/dUYMqSiZly pic.twitter.com/8KN8KW6ZvL
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 1, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)