मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागचा राजा चरणी आपला माथा टेकवला. आज त्यांनी लालबागच्या राजाची आरती केली. या वेळी त्यांच्यासोबत कार्यकर्तेही होते. मुख्यमंत्री आरती करत असतानाचा व्हिडिओ वृत्तसंस्था पीटीआयने आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

लालबागचा राजा हा अनेक गणेश भक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.  राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून केंद्रीय गृहमंत्री आणि उद्योगपतींपासून बॉलिवूड सेलिब्रेटींपर्यंत सर्वांनाच लालबागच्या राजाने भूरळ घातल्याचे पाहायला मिळते. अलिकडील काळात तर परराज्यातूनही अनेक भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आल्याचे पाहायला मिळते.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)