Republic Day 2024:  75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सकाळी मुंबईतील त्यांच्या शासकिय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर राष्ट्रध्वज फडकवला. ध्वजारोहण समारंभ पार पाडला आहे. या क्षणाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या शासकिय निवासस्थानी तिरंगा फडकवताना दिसत आहेत. त्यांच्या सोबत वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि इतर राजकिय नेतेही होते.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांनी जनतेला ७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वरील त्यांच्या अधिकृत हँडलवर पोस्टमध्ये भारतीयांना शुभेच्छा दिल्या. भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो... प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! असं पोस्ट मध्ये लिहले आहे. 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)