मुंबई मध्ये सायन-चुनाभट्टी कडून चेंबूर कडे जाणार्‍या मार्गावर प्रियदर्शनी जवळ रस्ता खचल्याचा प्रकार समोर आला आहे. रहदारीचा रस्ता खचला असून त्यामध्ये 40-50 गाड्या आत गेल्याचं समोर आलं आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली आहे. पण यामुळे आजूबाजूच्या भागात खळबळ पसरली आहे. रस्ता जिथे खचला आहे तिथे इमारतीचं काम देखील सुरू आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर मुंबईत अनेक ठिकाणी धोकादायक इमारती कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मुंबई मध्ये 197 जण मुंबईच्या अतिधोकादायक इमारती मध्ये वास्तव्याला; पोलिस बळाचा वापर करून रिकाम्या करणार इमारती .

पहा रस्ता खचलेली जागा  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)