Abki Baar 400 Par : कोल्हापूर येथे महायुतीचे खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्या प्रचार कार्यालयाचे आज (मंगळवारी) उद्घाटन पार पडले. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना 'अब की बार 400 पार'चा पुनरुच्चार केला. आपल्याकडे 353 जागा आहेत. आता फक्त 47 जागा जिंकायच्या आहेत. त्या झाल्या की अब बार 400 (abki baar 400 par) पार होणार आहे. आताचे टार्गेट मोठे नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. फक्त कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी सर्व प्रयत्न केले पाहिजेत. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी महाविकास आघाडीला टोलाही लगावला. एकमेकांसोबत भांडत बसता आणि सरकार बनवण्याची स्वप्न बघता, असे चंदक्रांत पाटील म्हणाले. (हेही वाचा : Raju Waghmare Join Shiv Sena : काँग्रेस प्रतक्ते राजू वाघमारे यांचा शिवसेनेत प्रवेश; नेत्यांच्या गलिच्छ राजकारणामुळे पक्ष सोडल्याचा केला खुलासा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)