Raju Waghmare Join Shiv Sena : काँग्रेस प्रतक्ते राजू वाघमारे यांचा शिवसेनेत प्रवेश; नेत्यांच्या गलिच्छ राजकारणामुळे पक्ष सोडल्याचा केला खुलासा
Photo Credit -x

Raju Waghmare Join Shiv Sena : काँग्रेसमधून एकामागे एक नेते बाहेर पडत आहेत. आता काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे (Raju Waghmare) यांनी काँग्रेसची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश करताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कॉमन मॅन मुख्यमंत्री असा उल्लेख केला. यावेळी बोलताना राजू वाघमारे यांनी काँग्रेस (Congress) वर जोरदार हल्ला केला. 'काही नेत्यांच्या गलिच्छ राजकारणामुळे पक्षाची अवस्था वाईट झाली आहे. काँग्रेस पक्ष आता उद्धव ठाकरे यांच्या हाताखाली दबलेला पक्ष झाला आहे. सांगली आणि भिवंडी येथील जागेबाबत असाच निर्णय झाला', असे उद्गार राजू वाघमारे यांनी काढले. (हेही वाचा :Mahavikas Aghadi Press Conference: महाविकासआघाडीचे जागावाटप जाहीर; शिवसेना-UBT 21, NCP (शरद पवार) 10), Congress- 17 जागांवर लढणार )

काय म्हणाले राजू वाघमारे

भिवंडीची जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली. या सर्वाचा परिणाम माझ्यावर झाला. यामुळे मी कॉमन मॅन मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश घेत आहे. भविष्य काय आहे, हे भविष्य दाखविण्यासाठी आज चांगलं दिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास काय आहे, हे दाखवून दिले आहे. त्यांनी कमी वेळेत राज्याचा मोठा विकास केला आहे. आतापर्यंत कोणत्याच मुख्यमंत्री यांनी असे काम केले नाही. हे विरोधकांना देखील मान्य करावे लागेल. राज वाघमारे यांनी सांगितले की, मी काँग्रेसमध्ये असताना एक सर्व्ह आला होता. त्या सर्व्हमध्ये लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, असे मी ऑन रिकोर्डवर संगितले होते. लाखो कार्यकर्ते त्यांच्या मागे आहेत. ते एअर कंडिशनमध्ये बसणारे नेते नाहीत. सामान्य मुख्यमंत्री आहेत.

मुख्यमंत्र्यांची काँग्रेसवर टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. 'राज्यात काँग्रेसचा ना झेंडा, ना अजेंडा राहिला आहे. 35 वर्षे प्रामाणिकपणे राजू वाघमारे यांनी पक्षाचे काम केले. त्यांच्यासारख्या कार्यकर्त्यांची पक्षात घुसमट होत होती. यामुळे त्यांनी चांगला निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अनेक प्रकल्प थांबले होते. आता जोरदार काम सुरु आहे.' असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.