MVA Seat Allocation: शिवसेना (UBT), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि मित्रपक्षांकडून निर्मित महाविकासआघाडीचे अंतिम जागावाटप आज (9 एप्रिल) जाहीर झाले. मुंबई येथील शिवालय येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जागावाटपाची अंतिम घोषणा करण्यात आली. या पत्रकार परिषदेस शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील, संजय राऊत, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि मित्रपक्षांचे अनेक नेते उपस्थित होते. मविआने संयुक्तरित्या दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना (21), काँग्रेस-17, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 10 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. प्रतिष्ठेच्या झालेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात मशाल चिन्हावरील चंद्रहार पाटील हेच उमेदवार असतील हे निश्चित झाले आहे.
महाविकासआघाडीचे एकूण जागावापट
शिवसेना-UBT पक्ष (एकूण जागा-21)
दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई (North West), मुंबई ईशान्य, जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशीव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणांगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ, वाशिम
काँग्रेस पक्ष (एकूण जागा-17)
नंदूरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य , उत्तर मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष (एकूण जागा-10)
बारामती, शिरुर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण, बीड
व्हिडिओ
महाविकास आघाडी संयुक्त पत्रकार परिषद । शिवालय, मुंबई - #LIVE https://t.co/aKVRup3zfc
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) April 9, 2024
महाविकासआघाडीने आपल्या जागा जाहीर केल्यामुळे आता जागावाटपाची सर्व बोलणी पूर्ण झाली असून कार्यकर्त्यांना प्रचारासाठी लागण्याचे आदेश मिळाले आहेत.