खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात आता बीड (Beed) शहरातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde)यांच्या विरोधात गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांच्याविरोधात 2 दिवसांपूर्वी नाशिकमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला. शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांच्या तक्रारीवरून नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाण्यात संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर बीडमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी बदनामीकारक वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवला आहे.
पहा ट्विट
Maharashtra | Case registered in Beed City Police Station u/s 211,153(A),500,501,504 and 505(2) of IPC against MP Sanjay Raut for allegedly defaming Maharashtra CM's son Shrikant Shinde. Further investigation is underway.
— ANI (@ANI) February 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)