सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पावसाचा जोर वाढला आहे. यामध्ये आज कसारा-इगतपुरी स्थानकादरम्यान दरड कोसळली आहे. या मार्गावर 3 लाईन आहेत. यामध्ये एक लाईन विस्कळीत झाली आहे. तर अन्य दोन लाईन वर सेवा सुरळीत आहे अशी माहिती मध्य रेल्वे कडून देण्यात आली आहे. आज आयएमडी ने मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांसोबतच पर्यटकांनीही काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. Tamhini Ghat Road Closure: ताम्हिणी घाट 5 ऑगस्ट पर्यंत वाहतूकीसाठी बंद.
पहा ट्वीट
Maharashtra | Boulders fell on the railway track between Kasara and Igatpuri stations under Central Railway. There are three lines on the route, one line is affected due to boulders but the remaining two lines are functioning so there is no impact on rail traffic on this line:… pic.twitter.com/zPuJGo68aS
— ANI (@ANI) August 3, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)