राज्यातील राजकीय घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट शक्तिप्रदर्शन करणार आहेत. अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटांनी 5 जुलै रोजी वेगवेगळ्या ठिकाणी बैठक बोलावली आहे. दोन्ही गट आपली ताकद दाखवण्यासाठी आपापल्या समर्थकांची जमवाजमव करणार आहेत. त्यासाठी पवार यांनी नेत्यांना सूचनाही दिल्या आहेत.
अजित पवार गटाची बैठक
अजित पवार यांच्या गटानेही 5 जुलैला बैठक बोलावली आहे. मुंबईतील एमआयटी येथे सकाळी 11 वाजता ही बैठक होणार असून महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. यासोबतच या बैठकीचे निमंत्रणही शरद पवार गटाच्या नेत्यांना पाठवण्यात आले आहे. राष्ट्रवादीचा कोणता नेता कोणत्या गटाशी आहे, हे दोन्ही बैठकांमधून स्पष्ट होणार असल्याचे मानले जात आहे.
अजित पवार और शरद पवार दोनों धड़ों ने 5 जुलाई को एक ही समय पर अलग-अलग जगहों पर बुलाई बैठक#AjitPawar#SupriyaSule#MaharashtraPolitics
— FirstBiharJharkhand (@firstbiharnews) July 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)