काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतिरीम संरक्षण वाढवून दिले आहे. भाजप नेते श्री श्रीमल यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात गांधी यांना हा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गिरगाव न्यायदंडाधिकाऱ्यांनी या फौजदारी प्रकरणाची कारवाई पुढे ढकलण्याचे निर्देश दिले आहेत. हे अंतरीम संरक्षण येत्या 23 जानेवारी 2024 पर्यंत वाढवण्यात आले आहे. (हेही वाचा, Rahul Gandhi यांनी PM Modi यांचा उल्लेख 'पनौती' केल्यावरून निवडणूक आयोगाची नोटीस; 25 नोव्हेंबर पर्यंत उत्तर देण्यास मुदत)

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)