Antilia Bomb Case: अँटिलिया बॉम्ब प्रकरणी माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला

माजी पोलीस कर्मचारी प्रदीप शर्मा यांना जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

Antilia Bomb Case: अँटिलिया बॉम्ब प्रकरणी माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला
मुंबई उच्च न्यायालय (फोटो सौजन्य-फाइल फोटो)

अँटिलिया बॉम्बस्फोट प्रकरण आणि व्यापारी मनसुख हिरण यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेले माजी पोलीस कर्मचारी प्रदीप शर्मा यांना जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. शर्मा यांनी मनसूख हिरनला संपवण्यासाठी त्यांचा माजी सहकारी सचिन वाझे याला मदत केल्याचा आरोप राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) केला होता. याच प्रकरणी शर्मा यांनी गेल्या वर्षी उच्च न्यायालयात एनआयए न्यायालयाच्या फेब्रुवारी २०२२ च्या आदेशाला आव्हान दिले होते. तरी मुंबई उच्च न्यायालयाने आता प्रदीप शर्माचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 23, 2023 04:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).