भारतीय तटरक्षक दलाने वनविभाग, JSW जयगड बंदर आणि राज्य प्रशासनासह महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी येथील गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरून 47 फूट लांबीच्या ब्लू व्हेलची सुटका केली आहे. 14 नोव्हेंबरच्या मध्यरात्री व्हेलला पुन्हा खोल पाण्यात सोडण्यात यश आल्याची माहिती भारत तटरक्षकाकडून देण्यात आली आहे. दरम्यान अशाप्रकारे व्हेल माशाला यशस्वीरित्या पुन्हा पाण्यात सोडण्याचा हा देशातील पहिलाच यशस्वी प्रयत्न आहे. व्हेल माशाने माणसाला जीवंत गिळले, 40 सेकंदानंतर उलटी करुन काढले बाहेर .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)