जळगाव जिल्ह्यामधील भुसावळ शहरामध्ये आज (27 जानेवारी) भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 3.3 रिश्टल स्केल अशी होती. दरम्यान यामध्ये कोणतीही जीवितहानी, वित्तहानी झालेली नाही. मात्र भूकंपाच्या हादर्याने काही भागात घरातील भाडीकुंडी पडल्याने नागरिकांमध्ये काही वेळ भीतीचं वातावरण होतं. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाने अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केले आहे.
?आज दिनांक 27/01/2023 रोजी सकाळी दहा वाजून 35 मिनिटांनी #भुसावळ तालुक्यात 3.3 रे. से भूकंपाचे सौम्य धक्के बसलेले आहेत. सदर भूकंपाच्या धक्क्यामुळे भुसावळ तालुक्यात कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तहानी झालेली नाही. तरी नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये. 1/5
— Collectorate Jalgaon/जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव (@JalgaonDM) January 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)