Ban On Nylon Manja in Mumbai: मकर संक्रातीचा सण संपुर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. मकर संक्राती हा सण प्रत्येक राज्यात वेगळ्या पध्दतीने साजरा केला जातो. दरम्यान, मकर संक्राती निमित्त महाराष्ट्र आणि गुजरात सह अनेक राज्यात पतंग उडवण्याची पद्धत आहे. राज्यात मकर संक्रांतीनिमित्त ठिकठिकाणी पतंग बाजीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जातात. अनेक ठिकाणी स्पर्धेचे आयोजनही केले जातात. अनेकवेळा नायलॉन मांजाचा वापर केला जातो. दरम्यान, मुंबईत नायलॉन मांजा विक्री व नायलॉन मांजा वापरावर बंदी टाकण्यात आली आहे. सिंथेटिक नायलॉन मांजाच्या वापरामुळे पक्षी व नागरिकांना होणारी जीवघेणी इजा लक्षात घेऊन बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयात प्लास्टिक किंवा अशा कोणत्याही सिंथेटिक मटेरियलपासून बनवलेल्या नायलॉन मांजाचा वापर, विक्री आणि साठवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार् या व्यक्तीवर बीएनएस कलम 223 अन्वये कारवाई केली जाईल.
मुंबईत नायलॉन मांजाच्या विक्री व वापरावर बंदी
Ban On Use Of Sale & Nylon Manja in Mumbai.
In view of fatal injuries caused to birds and citizens by the use of synthetic Nylon Manja, a ban has been imposed on the use, sale, and storage of the Nylon Manja made of plastic or any such synthetic material in Brihanmumbai Police…
— मुंबई पोलीस - Mumbai Police (@MumbaiPolice) January 14, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)