मागील ५५ वर्षांच्या वाटचालीत बालभारतीने (Balbharati 55th Anniversary) आपल्या 'सा विद्या या विमुक्तये' (Sa Vidya Ya Vimuktaye) या ब्रीदवाक्याशी बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या विकासाला बळ देणारी पाठ्यपुस्तके आणि इतर नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्य तयार करण्यात दिलेले योगदान गौरवास्पद असेच आहे, अशा भावना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी व्यक्त केल्या आहेत. शाळांमध्ये आधुनिक, नावीन्यपूर्ण आणि उपयुक्त अध्ययन-अध्यापन पद्धती पोहोचाव्यात यासाठी बालभारतीने केलेले अनेक सुसंगत बदल संस्थेच्या यशस्वी वाटचालीसाठी पुरक ठरले आहेत. भविष्यातही बालभारती आपला हा लौकिक कायम राखणार, असा मला विश्वास आहे. संस्थेच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!, असेही वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)