Pune Porsche Car Accident Case: पुणे कार अपघात प्रकरणी (Pune Porsche Car Accident Case) पुणे जिल्हा न्यायालयाने (Pune District Court) अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना जामीन मंजूर केला आहे. त्याला प्राथमिक प्रकरणात जामीन मिळाला असून त्याच्यावर बाल न्याय कायद्याच्या कलम 75 आणि 77 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 19 मे रोजी भरधाव वेगात असलेल्या पोर्श कारने मागून धडक दिल्याने पुण्यात कार्यरत असलेले अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा हे दोघे आयटी अभियंता ठार झाले होते. अल्पवयीन आरोपीच्या वडिलांचे वकील ॲडव्होकेट प्रशांत पाटील यांनी सांगितलं की, माझ्या अशिलाला पुण्यातील सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने घातलेल्या अटींचे पालन करणे हे त्याचे कर्तव्य आहे. (हेही वाचा - Pune Porsche Crash Case: 'पुणे पोर्शे दुर्घटनेतील किशोर आरोपी मानसिक आघातात असून त्याला थोडा वेळ द्यावा'; मुंबई उच्च न्यायालयाची टिपण्णी)

ANI ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)