Bombay High Court (Photo Credit: PTI)

Pune Porsche Crash Case: पुण्यातील पोर्शे दुर्घटनेतील (Pune Porsche Crash) आरोपी किशोरवयीन आरोपीलाही मानसिक धक्का बसला असून त्याला थोडा वेळ द्यावा, असे मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) शुक्रवारी सांगितले आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने अल्पवयीन मुलाला आधी जामीन मंजूर करून नंतर अचानक त्याला निरीक्षण गृहात ठेवण्याच्या पद्धतीकडे लक्ष वेधताना हे निरीक्षण नोंदवले.

पुणे पोर्शे दुर्घटनेत दोन जणांना आपला जीव गमवावा लागला होता. पुणे पोर्शे दुर्घटनेतील किशोर आरोपीही मानसिक आघातात असून त्याला थोडा वेळ द्यावा, असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. आरोपी किशोरच्या काकूने निरीक्षण गृहातून त्याच्या सुटकेसाठी याचिका दाखल केली होती. (हेही वाचा -Pune Porsche Crash Case: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपी चे वडील Vishal Agarwal, आजोबा Surendra Agarwal यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ)

19 मे रोजी मद्यधुंद अवस्थेत अल्पवयीन पोर्श कार अतिशय वेगात चालवत होता. तेव्हा कार दुचाकीला आदळली. त्यात अनीश अवधिया आणि अश्विनी कोष्टा या दोन सॉफ्टवेअर अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. बाल न्याय मंडळाने त्याच दिवशी अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर केला आणि त्याला रस्त्याच्या सुरक्षेवर 300 शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगण्यात आले. जामीन आदेशामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आणि पोलिसांनी आदेशात बदल करण्याची मागणी केली. (हेही वाचा - Pune Porsche Car Case: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये आमदाराच्या 2 कार्यकर्त्यांना अटक)

जामीन आदेशात सुधारणा करण्यात आली आणि मुलाला - ज्याचे आईवडील आणि आजोबा यांना देखील पोलिसांना लाच दिल्याबद्दल आणि बनावट रक्त चाचण्या केल्याबद्दल अटक करण्यात आली. तसेच अल्ववयीन आरोपीला बालगृहात पाठवण्यात आले. गेल्या आठवड्यात, किशोरच्या काकूने उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती.