प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 2017 सालच्या एका आंदोलनादरम्यान बच्चू कडू यांनी सरकारी कामांत अडथळा आणला होता. त्यावेळी नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने बच्चू कडू यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी बच्चू कडू यांनी प्रतिक्रीया दिली आहे. "दिव्यांग बांधवाचा ३ वर्षापासून निधी वाटप होत नाही म्हणून संबंधित आयुक्ताला ४ वेळेस पत्र देण्यात आले. दोन वेळेत दिव्यांग बांधवाने आंदोलन देखील केले." असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
पहा ट्विट -
नाशिक येथील जिल्हा सत्र न्यायालयाने कोर्टाने २०१७ मधे केलेल्या आंदोलनासाठी दोन वर्षाची सजा व ५००० रुपये दंड केला आहे. दिव्यांग बांधवाचा ३ वर्षापासून निधी वाटप होत नाही म्हणून संबंधित आयुक्ताला ४ वेळेस पत्र देण्यात आले. दोन वेळेत दिव्यांग बांधवाने आंदोलन देखील केले.
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) March 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)