राष्ट्रवादीचे नेते अजित पवार बंडखोर भूमिका घेत महाराष्ट्रातील शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपच्या युती सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांनी रविवारी राजभवनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (राष्ट्रवादी) आठ आमदारांसह शपथ घेतली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून गेल्या चार वर्षात त्यांनी तिसऱ्यांदा या पदाची शपथ घेतली आहे. या शपथविधीसाठी अकोला शहर जिल्हाध्यक्ष विजय देशमुख उपस्थित होते. आता त्यांच्यावर राष्ट्रवादीने कारवाई करत त्यांना पदावरून बडतर्फ केले आहे.
राष्ट्रवादीने दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे, 'महाराष्ट्राच्या राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री/मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी २ जुलै २०२३ रोजी श्री. विजय देशमुख उपस्थित राहिले. हे त्यांचे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी आहे. त्यामुळे त्यांना पक्षाच्या सदस्यत्वावरून व अकोला शहर जिल्हाध्यक्ष पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत आहे.' (हेही वाचा: Maharashtra Politics: महाराष्ट्रात राजकिय भुकंपा नंतर डॉ.अमोल कोल्हीची प्रतिक्रिया...... बाप नाही विसरायचा!)
महाराष्ट्राच्या राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री/मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी २ जुलै २०२३ रोजी श्री. विजय देशमुख उपस्थित राहिले. हे त्यांचे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी आहे. त्यामुळे त्यांना… pic.twitter.com/4Rv3TEpYLN
— NCP (@NCPspeaks) July 3, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)