भाजपने विद्यमान खासदार नवनीत राणा यांना आपल्या पक्षाकडून तिकीट दिले आहे. आता नवनीत राणांच्या अडचणीत वाढ होणार आहे. कारण वंचितने अमरावतीतून एक तगडा उमेदवार त्याच्यासमोर उभा केला आहे. रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकरांनी आज अमरावतीतून लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. ते वंचित बहुजन आघाडीकडून ही निवडणुक लढवत आहेत. आता आंबेडकर यांच्या एन्ट्रीने अवतीची निवडणूक खऱ्या अर्थाने तिरंगी होणार असे म्हणता येईल. कारण येथून तर काँग्रेसने बळवंत वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)