पुण्यात अंधश्रध्देपोटी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. महिलेस गर्भधारणा राहवी यासाठी विविध उपाय करण्यात आले पण तरीही महिला गरोदर राहत नसल्याने मांत्रिकाच्या सांगण्यावरुन महिलेस मानवी हाडांचे पावडर खावू घालण्यात आले. तरी या प्रकरणी पुणे पोलिसांनी ७ जणांवर गुन्हा दाखल केला असुन या प्रकरणी सखोल चौकशी करीत आहेत. पिडीत महिलेचा पती, सासरे आणि एका तांत्रिकासह 7 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तरी आयपीसीच्या कलम 498A, 323, 504,506 आणि अंधश्रद्धा विरोधी कायदा कलम 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अंधश्रध्देपोटी ज्या कुटुंबात हा प्रकार घडला आहे ते कुटुंब सुशिक्षित आहे. आम्ही त्यांना लवकरच अटक करू अशी माहिती पुण्याचे डीसीपी सुहेल शर्मा यांनी दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)