पश्चिम रेल्वे लोकलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याचे थेट प्रसारण दाखवले गेल्याचा आरोप होतो आहे. आपणही हे प्रसारण पाहिल्याचा दावा काही प्रवाशांनी सोशल मीडियावर केला आहे. पश्चिम रेल्वेच्या काही लोकल गाड्यांच्या एलईडी स्क्रीनवर राजकीय रॅलीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले असा दावा सोशल मीडियावरही करण्यात येत आहे. दरम्यान, अशा प्रकारे प्रसारण करण्याची कोणतीही परवाणगी कोणालाही देण्यात आली नव्हती, असे रेल्वेने स्पष्टीकरम दिले आहे. शिवाय संबंधित अधिकृत कंत्राटदारांकडूनही अशा प्रकारचे काही वर्तन झाले आहे काय? याच्या चौकशीसाठी प्रशासाने नोटीस पाठवलेअसल्याची माहिती आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)