राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरवरुन अज्ञात व्यक्तीकडून ही धमकी (Sharad Pawar Gets Death Threat) देण्यात आल्याचे समजते. यावर अजित पवार यांनी ट्विट करुन प्रतिक्रीया दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहले आहे की "आदरणीय पवार साहेबांना सोशल मिडियावर ‘तुमचा लवकरंच दाभोळकर होणार...’ अशी देण्यात आलेली धमकी, हे गंभीर प्रकरण आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं या धमकीची गांभीर्यानं दखल घेऊन आरोपींना तातडीनं गजाआड करावं. धमकी मागचा खरा मास्टरमाईंड शोधावा. अशा विचारांच्या समाजविघातक शक्तींना वेळीच रोखावं, हेच राज्याच्या हिताचं असेल."
पाहा अजित पवाराचे ट्विट -
आदरणीय पवार साहेबांना सोशल मिडियावर ‘तुमचा लवकरंच दाभोळकर होणार...’ अशी देण्यात आलेली धमकी, हे गंभीर प्रकरण आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं या धमकीची गांभीर्यानं दखल घेऊन आरोपींना तातडीनं गजाआड करावं. धमकी मागचा खरा मास्टरमाईंड शोधावा. अशा विचारांच्या समाजविघातक शक्तींना वेळीच…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)