Ajit Pawar Mimics Rohit Pawar: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बारामतीमध्ये शरद पवार गट व अजित पवार गट अशा दोघांच्याही सभा पार पडल्या. यावेळी शरद पवारांच्या सभेत रोहित पवार भावूक झाल्याचे दिसले. ते भाषण करताना मंचावर रडले. याबाबतचे काही व्हिडिओ समोर आल्यानंतर, आता अजित पवार यांनी आपल्या सभेमध्ये रोहित पवार यांची नक्कल केली. सध्या अजित पवारांचा हा नकलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ‘शेवटच्या सभेत कोणी तरी तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न करेल. कोणीतरी पठ्याने  डोळ्यातून पाणी काढले, तर मी सुद्धा काढतो. पण अशी कृत्ये चालत नाहीत', असे म्हणत अजित पवार यांनी भरसभेत रोहित पवारांची नक्कल केली.

लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. राज्यातील 11  लोकसभा मतदारसंघात उद्या 7 मे रोजी मतदान होत आहे. काल प्रचाराचा शेवटचा दिवस होता, अशात बारामतीमध्ये पवार कुटुंब सभांच्या माध्यमातून आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. बारामती जागेसाठी पवार विरुद्ध पवार यांच्यात लढत आहे. या जागेवर सुनेत्रा पवार यांच्या विरोधात सुप्रिया सुळे लढत आहेत. (हेही वाचा: Lok Sabha Elections 2024: पुणेकरांनो एका डायलवर जाणून घ्या तुमचे मतदान केंद्र; PMC ने जारी केले क्षेत्रिय कार्यालयनिहाय हेल्पलाईन क्रमांक)

पहा व्हिडिओ-

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)