मुंबई मध्ये शनिवार 27 ऑगस्टला चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमन होणार आहे. दोन वर्षांनंतर पुन्हा मंडळाकडून गणपतीची भव्य मूर्ती मंडपामध्ये विराजमान होणार आहे. दरम्यान या सोहळयात होणारी गर्दी लक्षात घेता मुंबई ट्राफिक विभागाने या भागात 10 तासांसाठी काही रस्ते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्या तुम्ही या परिसरात जाणार असाल तर पहा कोणते रस्ते असतील बंद? (हे देखील नक्की वाचा: Chinchpoklicha Chintamani Aagman 2022 Live: चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा 27 ऑगस्टला ; कुठे, कधी पाहू शकाल लाईव्ह स्ट्रिमिंग!) .
पहा ट्वीट
चिंतामणी गणपती आगमनाच्या पार्श्वभूमीवर दि. २७.०८.२०२२ रोजी स. १२ ते रा. १० दरम्यान डॉ.बी.ए.रोड उत्तर वहिनी बावला कंपाऊंड जंक्शन ते भारतमाता जंक्शनपर्यंत बंद राहील. नागरिकांनी टी.बी.कदम मार्ग - अल्बर्ट जंक्शन या मार्गाचा अवलंब करावा.
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) August 26, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)