माओवादी कारवाया केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवित दिल्ली विद्यापीठातील प्रा. साईबाबा आणि अन्य पाच जणांनाची मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली आहे. प्रा. साईबाबांसह महेश तिर्की, हेम मिश्रा, प्रशांत राही, विजय तिर्की आणि पांडू नरोटे अशी सुटका झालेल्यांची नावे आहेत. मार्च 2017 मध्ये गडचिरोली कोर्टाने  साईबाबा यांच्यासह एक पत्रकार आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील एका विद्यार्थ्यांसह अन्य एकाला माओवाद्यांशी संबंध आणि देशाविरोधात युद्ध पुकारण्याच्या कटात सामिल असल्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. तरी तब्बल पाच वर्षांनतर प्रा. साईबाबा यांची निर्दोष मुक्तता झाली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)