Glass Consignment Falls At Manufacturing Unit: पुणे शहरातील एका उत्पादन युनिटमध्ये काचेची खेप वाहनातून उतरवताना अंगावर पडल्याने चार कामगारांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत एक जण जखमी झाला आहे. अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले की, आम्हाला कात्रज परिसरात असलेल्या एका काचेच्या उत्पादन युनिटमध्ये काचेचा साठा उतरवताना पाच ते सहा कामगार अडकल्याचा फोन आला. त्यानंतर अग्निशमन दलाचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी जखमी झालेल्या पाच कामगारांना बाहेर काढले आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापैकी चार जणांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून घटनेचा तपास सुरू आहे.
पुण्यातील उत्पादन युनिटमध्ये काचेची खेप अंगावर पडल्याने 4 कामगारांचा मृत्यू -
Four workers killed, one injured as glass consignment falls on them at a manufacturing unit in Maharashtra's Pune city: Officials
— Press Trust of India (@PTI_News) September 29, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)