देशाचा इतिहास, पुरातत्व आणि वारसा जाणून घेण्याची आवड असणाऱ्यांना मोठी मेजवानी मिळणार आहे. राष्ट्रीय वाहिनी दूरदर्शनवर एक विशेष माहितीपट प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये भारतीय सभ्यतेची भव्यता, प्राचीन संस्कृतीची पुनर्रचना दर्शविली जाईल. दोन भागांमध्ये बनवलेल्या या माहितीपटाचे नाव, 'धरोहर भारत की पुनरुत्थान की कहानी', असे आहे.

दूरदर्शन वाहिनीशिवाय जिओ सिनेमावर 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता हा माहितीपट दाखवण्यात येणार आहे. माहितीपटात भारताच्या सांस्कृतिक पैलूची ओळख करून दिली जाणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही या माहितीपटात दिसणार आहेत. दोन भागांच्या या माहितीपटात भारतीय सभ्यतेच्या प्रतिकांचे जतन, प्राचीन संस्कृतीच्या वैभवाची पुनर्बांधणी आणि स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान दाखविण्यात येणार आहे. (हेही वाचा: दूरदर्शन वरील ‘धरोहर भारत की’ हा माहितीपट पाहण्याचे PM Narendra Modi यांचे नागरिकांना आवाहन)

दूरदर्शनवर पाहू शकाल माहितीपट 'धरोहर भारत की'- 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)