Mpox Strain: कोरोनाच्या भीतीतून जग अजून सावरले नव्हते की आता मंकीपॉक्सचा- एमपॉक्स (Mpox) धोका समोर आला आहे.. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एमपॉक्स ही जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. आता याच्या काही तासांनंतर हा आजार आफ्रिकेबाहेर पसरल्याचे उघड झाले. त्याचा पहिला रुग्ण स्वीडनमध्ये सापडला आहे. आतापर्यंत या आजारामुळे आफ्रिकन देशांतील 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. स्वीडनच्या सार्वजनिक आरोग्य सेवेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्या व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सचा संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे तो काही दिवसांपूर्वीच आफ्रिकेतून आला होता. सध्या तो MPOX Clade 1 प्रकाराच्या संसर्गास असुरक्षित आहे. त्याच्यावर स्टॉकहोममध्ये उपचार सुरू आहेत. यापूर्वीही एमपीओएक्सने त्रस्त असलेल्या रुग्णांवर उपचार केले गेले आहेत, मात्र यावेळी एजन्सी अधिक सावध आहे. (हेही वाचा: Monkeypox Cases: काँगोसह आफ्रिकन देशांमध्ये Mpox चा धोका वाढला, WHO ने जागतिक आरोग्य आणीबाणी केली जाहीर)
पहा पोस्ट-
#Sweden reported its first mpox case on Thursday, a day after the World Health Organization (#WHO) declared the infection a global public health emergency.
Read more: https://t.co/zVu0y9vNcx pic.twitter.com/WTwoF727QQ
— Hindustan Times (@htTweets) August 15, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)