Covid-19 Symptoms & Precautions: सध्या चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. परदेशात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने भारतात अलर्ट जारी करण्यात आला आहे. परदेशातून येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येत असून पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांना क्वारंटाईन केलं जात आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये, यासाठी योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. अशातचं आता सरकारच्या आरोग्य विभागाकडून कोरोना विषाणूची लक्षणं, संसर्गाची माध्यम आणि कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात ते सांगण्यात आलं आहे. (हेही वाचा - Covid-19 in Maharashtra: महाराष्ट्रात कोविड प्रकरणांमध्ये वाढ नाही; नवीन लाट येण्याची शक्यता कमी- Health Officials)
कोविड-१९ लक्षणं -
- कोरडा खोकला
- ताप
- घसा खवखवणे
- श्वास घेण्यास त्रास
कोरोना विषाणूचा संसर्ग कसा पसरतो?
- खोकण्या किंवा शिंकण्यातून
- शरीराचा स्पर्श झाल्याने
- सांसर्गिक वस्तुद्वारे
- गर्दी केल्यामुळे
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काय काळजी घ्यावी?
- आपले हात वारंवार धुवावे.
- नेहमी मास्क घालावे.
- आजारी व्यक्तीला भेटणे टाळावे.
- शिंकताना किंवा खोकताना चेहरा नेमी झाकावा.
कोविड-१९ ची लक्षणे, त्याचे प्रसार माध्यमे आणि घ्यावयाच्या काळजीबाबत आपल्याला पुरेपूर माहिती असणे आवश्यक आहे.@MoHFW_INDIA @moayush @USAID @usaid_india @JSIhealth @MantralayaRoom#momentumindia #LargestVaccineDrive #VaccinEquity #GlobalHealth #COVID19 #Symptoms #TakeCare pic.twitter.com/A7N1aSvskP
— Maha Arogya IEC Bureau (@MahaHealthIEC) January 5, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)