देशात मंकीपॉक्सच्या संसर्गाने थैमान घातले असून, आतापर्यंत दोन जणांमध्ये या प्रकरणाची पुष्टी झाली आहे. भारतात या विषाणूच्या आगमनामुळे चिंता वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगातील 75 देशांमध्ये आतापर्यंत 11634 हून अधिक पुष्टी झालेल्या मंकीपॉक्स प्रकरणांची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे 1,500 संशयित प्रकरणांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. मंकीपॉक्स संक्रमित प्राणी किंवा मानव यांच्या संपर्कात आल्याने कोणालाही शकतो. या संसर्गाबद्दल लोकांच्या मनामध्ये भीती असताना आता, महाराष्ट्र सरकारने मंकीपॉक्स बाधित व्यक्तीबाबत कोणती काळजी घेतली पाहिजे ते समजून सांगितले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)