सांगली जिल्ह्यातील तासगावचा रथोत्सव हा राज्यभरात प्रसिद्ध आहे. आज 243 वा रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या रथोत्सवासाठी साधारण 2 लाख भाविक उपस्थित होते. रथोत्सवादिवशी गणपती पंचायतन संस्थानच्या दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन झाले. मराठा साम्राज्याचे शेवटचे सरसेनापती परशुरामभाऊ पटवर्धन यांनी 1779 मध्ये तासगावच्या श्री सिद्धिविनायक गणपतीची प्रतिष्ठापना केली. तेव्हापासून हा रथोत्सव चालू आहे. या रथातून श्री ganesh आपल्या वडिलांना भेटण्यासाठी श्री काशी विश्वेश्वर मंदिरात जातात अशी आख्यायिका आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)