Promise Day 2023 Wishes: प्रॉमिस डे (11 फेब्रुवारी) व्हॅलेंटाईन वीकच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. प्रॉमिस डेच्या दिवशी, भागीदार, प्रेमळ जोडपे एकमेकांना कायमचे एकत्र राहण्याचे वचन देतात. प्रेमाच्या भावनेचे विश्वासात रूपांतर करण्यासाठी, लोक त्यांच्या प्रेमासोबत कायमचे राहण्याचे, त्यांच्यासोबत राहण्याचे ठाम वचन देतात. प्रॉमिस डेच्या दिवशी तुमच्या जोडीदाराला प्रेमाने वचन देण्यासाठी तुम्ही त्याला खास संदेश पाठवू शकता. यामुळे तुमचे नाते पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होईल. तुम्ही प्रॉमिस डेच्या दिवशी हे खास मेसेज पाठवून तुमचे मन व्यक्त करू शकता. प्रॉमिस डे वर, तुम्ही WhatsApp संदेश, ग्रीटिंग्ज कार्ड्स, कोट्स, Facebook वर कायम तुमच्या जोडीदारासोबत राहण्याचे वचन देऊ शकता.
Promise Day 2023 Wishes in Marathi:
तू दिलेले वचन खोट आहे, असे कधीच समजणार नाही!
आजही तुझी वाट बघतोय आणि उद्याही बघणार,
तुला विसरूण जाणे, मला कधीच जमणार नाही!
...प्रॉमिस डे च्या हार्दिक शुभेच्छा!

सावलीसारखा आयुष्यभर तुझी साथ देईल
तू जिथे जाशील तिथे तुझ्या पाठीपाठी येईल,
अंधारात असताना सावलीदेखील साथ सोडते
अशा अंधारातही प्रकाशासारखा तुझ्यासोबत राहील!
...प्रॉमिस डे च्या हार्दिक शुभेच्छा!

मला वचन दे, प्रेमात कधीच दुरावा येणार नाही!
खरचं माझे खूप प्रेम आहे तुझ्यावर, कधीच मला सोडून जाणार नाही!
...प्रॉमिस डे च्या हार्दिक शुभेच्छा!

एक दिवस नव्हेतर संपूर्ण जीवन तुझ्यावर नावावर करेल
माझ्या जीवनातील प्रत्येक आनंदाचा क्षण तुझ्या नावावर करेल,
वचन दे आयुष्यभर माझ्यासोबत राहशील
खर सांगतो त्यावेळी माझा श्वासदेखील तुझ्या नावावर करेल!
... प्रॉमिस डे च्या हार्दिक शुभेच्छा!

तू माझ्यासाठी बेस्ट आहेस
त्यामुळे तू कायम माझ्यासोबत रहा,
आपण दोघे मिळून पृथ्वीवर स्वर्ग बनवू.
प्रॉमिस डे च्या हार्दिक शुभेच्छा!

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)