शाहू महाराजांच्या जयंती निमित्त राज्यपाल रमेश बैस ते देवेंद्र फडणवीस यांनी आज ट्वीटरच्या माध्यमातून आपली आदरांजली अर्पण केली आहे. शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते. कागल येथील घाटगे घराण्यात त्यांचा 26 जून 1874साली जन्म झाला होता. 28 वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुख्यमंत्री, उपमंत्र्यांनी आज आपल्या शासकीय निवासस्थानी देखील राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करू आपली आदरांजली अर्पण केली आहे. Shahu Maharaj Jayanti 2023 HD Images: छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त Quotes, WhatsApp Status, SMS, Wallpaper द्वारा शेअर करा समाजसुधारकाच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन!
राज्यपाल रमेश बैस
राजषी॔ छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏🏻
Humble tributes to Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj on his birth anniversary 🙏🏻 pic.twitter.com/pVfmHTQJJd
— Governor of Maharashtra (@maha_governor) June 26, 2023
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सर्वसामान्य बहुजन समाजाला नवीन जीवन देणारे, गरीब, शोषित आणि वंचितांचे कैवारी, थोर समाजसुधारक, लोककल्याणकारी राजे राजर्षी #छत्रपती #शाहू_महाराज यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन... pic.twitter.com/5tJ60pF4hd
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 26, 2023
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सामाजिक सुधारणांचे अग्रणी, वंचितांच्या प्रगतीसाठी पुढाकार घेणारे राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम!#ChhatrapatiShahuMaharaj pic.twitter.com/RXnEd3InRU
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 26, 2023
पंकजा मुंडे
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन. !!#ShahuMaharaj pic.twitter.com/fFp5mvdIvG
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) June 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)