जुलै महिना सरला की सर्वांना वेध लागतात गणेशोत्सवाचे. यंदाच्या वर्षी पुणे महापालिका काहीसे लवकरच तयारीला लागल्याचे दिसते. पीएमसीने गणेश मूर्ती बनविणाऱ्या मुर्तीकारांसाठी काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. गणेशोत्सवादरम्यान पर्यावरणाची कमीत कमी हानी व्हावी यासाठी पहापालिकेने ही तत्वे जारी केली आहेत. दुसऱ्या बाजूला बहुप्रतिक्षित सण जवळ आला असून, गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी शहरात आतापासूनच तयारी सुरू झाली आहे.

पालिकेने जारी केलेली मार्गर्शक तत्वे

  • पीओपीच्या मूर्ती तयार करण्यासाठी कोणत्याही परवानग्या नाहीत
  • पर्यावरणपूरक मातीचा वापर करून मूर्ती तयार कराव्यात. ज्या पाण्यात सहज विरघळतील.
  • मूर्तीवर दागिने करण्यासाठी वाळलेल्या फुलांना प्राधान्य दिले जावे..
  • मूर्ती अधिक आकर्षक बनवण्यासाठी नैसर्गिक रंगांचाचा वापर करावा.
  • मूर्ती इको-फ्रेंडली आणि बायोडिग्रेडेबल रंगांनी रंगवल्या पाहिजेत.
  • सजावटीसाठी, धुऊन पुन्हा वापरता येईल असे कापड वापरण्यात यावेत.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)