Kartiki Ekadashi 2022 Rangoli Design: कार्तिकी एकादशीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देव उठणी एकादशी असेही म्हणतात. देव उठणी एकादशीच्या दिवसापासून चातुर्मास संपतो आणि शुभ कार्याला सुरुवात होते. कार्तिक महिना भगवान विष्णूला प्रिय आहे. या महिन्यात श्री हरी आणि लक्ष्मीजींची पूजा करण्याचा नियम आहे. धर्मग्रंथानुसार कार्तिकी एकादशीच्या दिवशी सृष्टीचा निर्माता भगवान विष्णू चार महिन्यांनी योगनिद्रेतून जागे होतात आणि पुन्हा सृष्टीची जबाबदारी स्वीकारतात. यावर्षी कार्तिकी एकादशी 4 नोव्हेंबर 2022 रोजी आहे. कार्तिकी एकादशीला रांगोळी काढणे शुभ मानले जाते. प्रत्येकजण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि पूजास्थळी सुंदर रांगोळी काढतो.
कार्तिकी एकादशी निमित्त काढा 'या' खास रांगोळी डिझाईन्स -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)